March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बार्शी:
मळेगाव ता.बार्शी येथे भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ मळेगावचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या घरासमोरील ध्वजारोहण हनुमंत राऊत,यांच्या हस्ते करण्यात आले, मळेगाव ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण प्रल्हाद माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, शहीद स्मारक येथील ध्वजारोहण माजी सैनिक नागनाथ विटकर,व संतोष गाभने यांच्या हस्ते करण्यात आले, सोलापू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील ध्वजारोहण नूतन ग्रामपंचायत सदस्य पूजा इंगोले,यांच्या शुभहस्ते करण्यात आले, जि.प.प्रा.शाळा मळेगाव येथील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष खडके,यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी,माजी सरपंच गुणवंत मुंढे,माजी सरपंच संतोष निंबाळकर,श्री शिवजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष अंकुश माळी,राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्ञानदेव पवार,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,गाव कामगार तलाठी गणेश राजे,जिल्हा बँकेचे शाखाधिकारी महेश शेटे,माळी सेवा संघाचे संपर्क प्रमुख कल्याण माळी,ग्रामपंचायत चे नूतन सदस्य पूजा इंगोले,तारा नलावडे,प्रकाश गडसिग,प्रल्हाद दळवी,धीरज वाघ,पाणी पुरवठा,आरोग्य,व स्वच्छता समितीचे सदस्य अशोक माळी,गणेश गाभने,ग्रामपंचायत चे क्लार्क सुरेश कांबळे,संगनक परिचालक प्रशांत पटणे,आरोग्य कर्मचारी रुकुम आडगळे,आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply