March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सोलापूर;

मळेगाव ता.बार्शी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र  येथे जागतिक महिला दिनानिमित्त गावामधील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते,शिबिराची सुरवात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी महिलांची हिमोग्लोबिन, रक्तगट,शुगर,इत्यादी आरोग्य विषयीच्या चाचण्या करण्यात आल्या,यावेळी मळेगाव ग्रामपंचायत च्या नूतन सरपंच ज्योती संजयकुमार माळी यांचा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने सत्कार करण्यात आला,तसेच महिला दिनानिमित्त महिला ग्रामपंचायत सदस्य पूजा बोधले,सुजाता पाडुळे यांचा सत्कार करण्यात आला, सरपंच ज्योती माळी,यशदाचे शिवाजीराव पवार,सविता सरवदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली,या कार्यक्रमासाठी माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गंगूताई माळी, यशदाचे शिवाजीराव पवार,ग्रा.प.सदस्य सुजाता पाडुळे,पूजा इंगोले,तारा नलावडे,सावता परिषदेचे अध्यक्ष अशोक माळी,धनगर समाज्याचे नेते समाधान पाडुळे,ईस्माईल सय्यद,विकास मुंढे,अनुदाय आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी पवार,आरोग्य सेविका सविता पांणढवळे, रक्तपेढीचे कपिल हिंगमीरे, अनुराधा,फोके,सुप्रिया लकदिवे,ताजुद्दीन सय्यद,आशा वर्कर रुपाली चव्हाण,आश्विनी नलावडे,अंगणवाडी सेविका,आदी मान्यवर व गावातील महिला यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply