October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगाव येथे कोरोना जनजागृती मोहीम


बार्शी ;

मळेगाव ता बार्शी येथे कोरोना विषाणूसंदर्भात मळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, देशामध्ये अनेक रुग्ण कोरोनाचे सापडत आहेत,लोकांनी मास्क न वापरणे,सोशल डिस्टनसिग न पाळणे,साबणाने हात न धुणे आशा हलगर्जीपणामुळे कोरोना वाढत आहे,मळेगाव मध्ये देखील कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे सरपंच संजयकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत ने जनजागृती करण्यास सुरवात केली आहे,जे कोणी विनामास्क दिसतील त्या व्यक्तीला दंड आकारण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे दंडाच्या भीतीने लोकानी मास्क वापरण्यास सुरवात केली आहे, या जनजागृती साठी सरपंच संजयकुमार माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,ग्रामसेवक शिवाजीराव गायकवाड,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे,सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी,जि.प.प्राथमिक शाळेचे विठ्ठल कोकरे,कांता थोरात,अनिल खुळे, सुलभ नादवटे,ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे,संगनक परिचालक प्रशांत पटणे,आरोग्य कर्मचारी रुकुम आडगळे,ग्रामरोजगार सेवक दादा आपुणे,आदी यावेळी उपस्थित होते,

Leave a Reply