March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगाव ता.बार्शी येथील सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान

महाराष्ट्र स्पीड न्युज
मळेगांव, ता.बार्शी कर्मवीर ना मा गडसिंग गुरूजी मित्र विद्यालय मळेगांव मधील , इ.१० वी सन १९९९-२००० मधील  बॅच चे विद्यार्थी  बालाजी शिंदे व  किशोर गुरव हे  भारतीय सैनिक दलामधून १७ वर्षाची भारत मातेची सेवा यशस्वी करून सेवा निवृत्त झाले.त्यामुळे त्यांचा सेवा निवृत्ती बद्दल मित्र वर्ग परीवारा तर्फे शाल, फेटा,व गुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला, व त्यांना पुठील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. व सदर कार्यक्रमात येथून पुढे  सर्वांनी वार्षिक ठरावीक स्वरूपात वर्गणी  जमा करून ती आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मदत स्वरूपात सर्वांनी देण्याचे  एकमताने ठरवले,व सर्वांनी दोन्ही सेवानिवृत्त मित्रांना भाषणामधून शुभेच्छा देल्या व जुण्या  आठवणींना उजाळा देण्यात आला, आजचा कार्यक्रम नितीन पवार, यांच्या फॉर्म हाऊस वर घेण्यात आला. कार्यक्रमासाठी बालाजी शिंदे, किशोर गुरव यांच्यासह नितीन पवार, सचिन पवार ,नितीन गोरे,निशांत गडसिंग, नागेश माळी,वैभव श्रीखंडे, हाजू शेख ( मळेगांव), रमेश गायकवाड, दिलीप घोलप,शंकर मोरे,शंकर घोलप,गणेश मोरे( महागांव), पप्पु आगलावे- पाटील, कल्याण आगलावे, खंडू आगलावे,जयराम गायकवाड (बावी), मनोज काशीद (पिंपरी. सा.), आशीप पठाण(जामगांव), इब्राहिम शेख,गणेश पाटील( पिंपरी.आर), आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply