October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगावच्या  माळी परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम,  नदीत अस्थी विसर्जन न करता शेतात केले अस्थी विसर्जन व केली फळाच्या झाडाची लागवड

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुक्यातील  मळेगाव येथील नामांकित मल्ल की ज्यांनी कुस्ती या क्षेत्रात गावचे नाव महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर कोरले असे पै.लक्ष्मण निवृत्ती माळी(८० वर्ष) यांचे दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने मळेगाव येथे कुस्ती क्षेत्र पोरकं झालं,लहान पनांपासून कुस्ती क्षेत्राचे बाळकडू मिळाले व कुटूंबातील व‌ गावातील बरेच पैलवान त्यांनी घडवले व मळेगावची कुस्तीची परंपरा अखंडपणे चालू ठेवली इतर लोकांनाही कुस्ती क्षेत्रात नाव करण्यास तात्यांनी प्रोत्साहन दिले होते.
त्यांची आपल्यामध्ये कायम स्वरूपाची आठवण रहावी या उद्देशाने सरपंच गुणवंत मुंढे व रमेश माळी यांनी नदिमध्ये अस्थी विसर्जन  करण्याची हिंदु धर्माच्या रूढी परंपरा जरी असल्या तरी प्रदुषण टाळण्यासाठी व वृक्षारोपणाची अत्यावश्यक गरज असल्यामुळे माळी परिवाराने तात्यांच्या   अस्थीचे विसर्जन कोणत्याही मोठ्या नदीमध्ये न करता त्या अस्थी दोन नवीन रोपट्यांमध्ये घालाव्या असे विचार व्यक्त केले .
माळी परिवाराचे  बाळासाहेब माळी व अंकुश माळी यांनी देखील या निर्णयाला होकार दिला व दोन फळझाडे लावली तर त्या फळझाडातच तात्या आम्हाला कायमचे दिसतील अशी भावना व्यक्त केली, व त्या वृक्षाचे रोपण गावातील माजी सैनिक आजीनाथ गाडे व जेष्ठ नागरिक प्रल्हाद माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
  यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना मातीची जाण ठेवणा-या तात्याना हिच खरी श्रद्धांजली आहे अशी भावना हभप अंगद श्रिखंडे व शिवाजी पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी बाळासाहेब माळी,गंगुताई माळी,अंकुश माळी,सुभाष बोराटे,मोतीराम गायकवाड,दादासाहेब करणे,संजय माळी, आबासाहेब माळी,रमेश माळी,भारत माळी, गिरीश माळी,व माळी परिवाराचे सदस्य व सर्व नातेवाईक उपस्थित होते,माळी परिवाराचा हाच आदर्श गावातील व इतर गावातील नागरिकांनी घ्यावा अशी भावना त्या दिवशी गावातील लोकांमध्ये होती.

Leave a Reply