June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मराठी पत्रकार दिवसी अॉल जर्नालिस्ट अॅंड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने पत्रकारांचा केला सत्कार.

कासिम मिर्झा  नवाब मोमिन यांना आदर्श पत्रकार देऊन गौरव

Advertisement

चांदूर बाजार;-
चांदूर बाजार येथे ०६ जानेवारी बाळ शास्त्री जांभेकर मराठी पत्रकार दिवसाचे अवचित्य साधून अचलपुर-परतवाडा या जुळ्या शहरामध्ये आॅल जर्नालिस्ट अॅंड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांचे मनोबल वाढले व त्यांनी तळागळातील विषयांना लोकांच्या नजरेत यानुन देण्या साठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेल्या होता. कार्यक्रम दुपारी १ वाजता सुरू झाला व ४ वाजेपर्यंत चालला. या कार्यक्रमाला खास संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, गणेश कोळी व केंद्रीय सदस्य समीर कुरेशी उपस्थित होते.
       कार्यक्रमामध्ये कासिम मिर्झा यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दिपक नागरे यांना दर्पणकार बाळशास्री जांभेकर राज्य पुरस्कार व गौतम लंके यांना कै. जेष्ठ पञकार नवाब मोमिन व मधुकर लोंढे स्मृती पुरस्कार तर गोविंद सिंह राजपुत यांना राज्य युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मोहम्मद अजरउदिन यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरमसपुरा येथी ठाणेदार जमिल शेख व सामाजिक कार्यकर्ते गौरव भोवते उपस्थित होते. मनिष गुप्ता,
सैयद असलम, अब्दुलशाकिर,रविंद्र औतकर, नाजिम शाह, इमरान खान, नावेद शाह, सरवर काजी, मिर्झा कामरान बेग आदी संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply