June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मराठा आरक्षण, छत्रपती संभाजीराजेंनी घेतली सामाजिक न्याय मंत्र्यांची शिष्टमंडळासह दिल्लीत भेट

दिल्ली :
१०२ व्या घटना दुरुस्ती पेच मराठा आरक्षण बाबतीत छत्रपती संभाजीराजेंनी सामाजिक न्याय मंत्र्यांची शिष्टमंडळासह दिल्ली येथे भेट घेतली.

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणी मध्ये सध्या १०२ घटना दुरुस्ती बाबतीत समज गैरसमज यामुळे सुनावणी पुढे जाऊ शकते व राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकार चे इतर मागास प्रवर्गातुन आरक्षण देण्याचे अधिकार काढले आहेत की नाही या बाबतीत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत , केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टात निर्माण झालेले समज गैरसमज दूर करण्याविषयी निवेदन देण्यात आले.व सोबत संसदेच्या सिलेक्ट कमेटी अहवाल व संसदेत बिल मंजूर झाले वेळीचा तपशील सादर केला.यावर राज्य सरकारचे अधिकार जात नसल्याचे मंत्री महोदयानी स्पष्ट केले व त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने प्रतिपादन केले जाईल असे सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांची छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांच्या सह १०२ घटना दुरुस्ती मुळे राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार जात नसले बाबतीत भेट घेतली.

Leave a Reply