October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मराठमोळ्या रितेश देशमुख ला चाहत्यांकडून भन्नाट गिफ्ट , भाऊक होऊन अभिनेता म्हणाला..

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला आज कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. त्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचा चाहतावर्ग भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही आहे. रितेश आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यासोबतच तो आपले नवनवीन फोटो, पत्नी जेनेलिया देशमुख आणि मुलांसोबत मजा-मस्ती करतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच आता त्याने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याला चाहत्याकडून मिळालेल्या खास भेटवस्तू संदर्भात आहे.

खरं तर पेंटिंग आर्टिस्ट आणि चाहता गौरव भाटकर याने रितेश आणि त्याचे वडील विलासराव देशमुख यांचे पेंटिंग भेट म्हणून दिले आहे.

याचा फोटो त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने या फोटोला ‘धन्यवाद गौरव भाटकर. तुझे आर्टवर्कने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. ही मला मिळालेल्या सर्वात खास गोष्टींपैकी एक विशेष गोष्ट असेल. नम्र आणि कृतज्ञ.’आपल्या वडिलांच्या म्हणजेच विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो आपल्या वडिलांच्या आठवणीत पुरता दंग झालेला दिसत होता. गौरवने या पेंटिंगचा व्हिडिओ आणि विलासराव यांचे चित्र रितेशला भेट म्हणून दिले.

Leave a Reply