October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भोयरेच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाचे दशरथ टेकाळे तर उपसरपंच पदी मुंढे

बार्शी ;
भोयरे ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  आ.राजेंद्र राऊत गटाचे दशरथ (पपु) टेकाळे तर उपसरपंचपदी रूक्मीणी मुंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडीवेळी सोनाली खंडागळे,रूक्मीणी गरड,अंकुश बांगर व सनातन पाटील हे नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य श्रीराम मुंढे,लक्ष्मण बांगर,बलभिम पाटील,पुरीचे सरपंच अमर पवार,अमृत राऊत, चेतन पाटील, प्रदीप पुंड,समाधान विधाते,राजेश टेकाळे,संतोष पुंड,सुहास पाटील,तानाजी पाटील, दत्तात्रय खंडागळे,बाळु देशमुख आदी उपस्थित होते.
आ.राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गाव विकासासाठी प्रयत्नशील राहु असे नुतन सरपंच पपु टेकाळे यांनी सांगितले.

Leave a Reply