June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भिंत अंगावर पडून मजूराचा मृत्यू ;  मालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तब्बल २० दिवसानंतर गुन्हा दाखल

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज

जुन्या हॉलचे बांधकाम पाडत असताना अंगावर भिंत पडून बांधकाम मजूराचा नुकताच मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनी मालक पदमचंद कांकरिया व ठेकेदार हरीदास मोहन मुसळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे. खासेराव फकिरा ठोंगे (वय ६०, रा. उपळाई ठोगे ता. बार्शी) असे मयत झालेल्या मजूराचे नाव आहे. दि १२ नोव्हेंबर रोजी सदरची घटना घडली होती. मयताचा मुलगा राहुल खासेराव ठोंगे याने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हा मिस्त्री काम करतो, भाऊ लष्करी सेवेत आहे तर फिर्यादीचे वडील १५ वर्षपासून ठेकेदार हरिदास मुसळे यांच्याकडे कामास जात होते. दि.१२ नोव्हेंबर रोजी फिर्यादी व त्यांचे वडील खासेराव ठोंगे हे नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. दुपारी १ वा. इंडस्ट्रीअल इस्टेट नं.२, प्लॉटमधील पदमचंद कांकरिया यांचे जुना हॉलचे बांधकाम पाडत असताना खासेराव यांच्या अंगावर भिंत पडून जखमी होऊन ते मयत झाले. भिंत पाडत असताना फिर्यादीचे वडिलांना ठेकेदार किंवा मालक यांनी कोणत्याही प्रकारचे सुरक्षेच्या दृष्टीने साधने, हेल्मेट, गमबुट वगैरे साहित्य दिले नव्हते. तसेच इतर कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. तसेच भिंतीवरील लोखंडी कैची कापून भिंतीवर ठेवून हयगय केल्यामुळे सदरची भिंत त्यांचे वडिलांचे अंगावर पडून त्यामध्ये त्यांचे डोक्यास मार लागून जखमी होऊन मयत झाले आहेत. अशा आशयाची तक्रार दिली आहे. त्यावरून कांकरिया व मुसळे या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश शिंदे हे करत आहेत.

Leave a Reply