October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भालगांवच्या सरपंच पदी सौ.भारती मदन दराडे तर उपसरपंच पदी सुनील सानप यांची बिनविरोध निवड


बार्शी ;
  बार्शी तालुक्यातील  भालगांव ग्रामपंचायतीच्या आ.  राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे यांच्या नेतृत्वाखाली  सौ.भारती मदन दराडे व उपसरपंचपदी सुनील सानप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मण काळे व सहाय्यक म्हणून ग्रामसेवक रामेश्वर चौरे  यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य सौ.रतनबाई त्रिंबक दराडे, सौ.कांचन विजयकांत दराडे, सौ.सुनिता सचिन सोनवणे, सौ.सुनिता गणेश भोसले, दशरथ दराडे, उमराव दराडे,राजेंद्र कराड आदि सदस्य उपस्थित होते.
यावेळी तानाजी  दराडे, सोमिनाथ  सोनवणे, नागनाथ सोनवणे, धन्यकुमार जाधवर, अबन कराड, दत्तात्रय घोळवे, विजयकांत दराडे, गणेश भोसले, बन्सीलाल दराडे, भावबा दराडे, अभिमन्यु दराडे, अमोल सोनवणे, महेश दराडे सर, भास्कर डोळे, बाबा कराड , प्रतीक जाधवर, बिटू डोळे आदी उपस्थित होते.

Advertisement

आजच्या निवडीनंतर विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहू असे अभिवचन दिले. जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहू. “माझं गांव, आदर्श भालगांव” या संकल्पनेला सार्थ करु असे सांगितले.नुतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply