October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भारतीय रेल्वेत आठवी पासलाही मिळणार नौकरी,सविस्तर वाचा

मुंबई : सरकारी नोकरी उपलब्ध नसल्याची नेमही ओरड होते. मात्र, भारतीय रेल्वेने आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी दिली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2021 पासून सुरु होणार असून 31 मार्चपर्यंत अर्ज करता येतील. रेल्वे विभागातर्फे एकूण 182 जागांसाठी अर्ज निघाले आहेत. (government jobs in indian railway diesel locomotive works recruitment)

Advertisement

भारतीय रेल्वेच्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स (Diesel Loco Modernisation Works) विभागातर्फे Apprentice म्हणून काम करण्यासाठी (Indian Railways Recruitment 2021) अर्ज मागवण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे असतील तर ते Indian Railways च्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स च्या dmw.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईला भेट देऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.

तसेच थेट https://dmw.indianrailways.gov.in/ या लिंकवर जाऊन वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येतील. या संबंधीची सर्व माहिती https://dmw.indianrailways.gov.in/uploads/files या लिंकवर मिळेल. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार Indian Railway Recruitment 2021 अंतर्गत विविध 182 जागांसाठी अर्ज मावण्यात आले आहेत.

Indian Railways Recruitment 2021 साठी महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात :12 मार्च 2021

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 31 मार्च 2021

या पदासाठी अर्ज करु शकता

इलेक्ट्रीशियन- 70 पद

मेकॅनिक- 40 पद

मशीनिस्ट- 32 पद

फिटर- 23 पद

वेल्डर- 17 पद

पात्रता काय ?

इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, मशीनिस्ट आणि फिटर या पदासाठी अर्ज करायचा करायचा असेल तर कमीत कमी 50% टक्क्यांसह इयत्ता दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित फिल्डमधील ITI केलेला असणे गरजेचे आहे. वेल्डर या पदासाठी आयटीआयसह आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

वय किती असावे?

भारतीय रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसा या पदांसाठी उमेदवाराचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार किती मिळणार?

या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाईल. जो उमेदवार 1 वर्षासाठी प्रशिक्षण घेत असेल त्याला 7000 रुपये प्रतिमहिना स्टायपंड मिळेल. तर 2 वर्षे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवाराला रेल्वे विभागाकडून 7700 रुपये प्रति महिना पगार असेल. जो उमेदवार 3 वर्षे प्रशिक्षण घेईल त्याला 8050 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

Leave a Reply