February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भारतात 11 ते 14 एप्रिल लसीकरण उत्सव ,पंतप्रधान मोदींची घोषणा

देशात कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या (CM Meeting with PM) बैठकीत मांडले आहे. आपण कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) नादात कोरोना चाचण्यांकडे (Corona Testing) दुर्लक्ष केले व कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदींनी सांगितले. तसेच आगामी 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय लढायचे आहे हे लक्षात ठेवायलाच हवे. यामुळे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोरोना चाचण्या वाढवायला हव्यात, असेही मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
कोरोनाच्या या संकटात पुन्हा एकदा जनतेला मास्क, सोशल डिस्टंन्सिंग आदी गोष्टी पाळण्याबाबत जागरूक करायला हवे. आपण मृत्यूदर कमी केला पाहिजे. लोकांची माहिती असल्यास आपल्याला त्यांचे जीव वाचविता येणार आहेत.

Advertisement

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्याच पाहिजेत. देश, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यातच. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप आवश्यक आहे, असेही मोदी म्हणाले.

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी व कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांचा शोध आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे महत्वाचे आहे. युद्धपातळीवर हे काम करण्याची गरज आहे. आपल्याला आता पुरेसा अनुभव आलेला असुन  सोबत अन्य स्त्रोतांसह लसही आहे, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

Leave a Reply