December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भाजपा अल्पसंख्याक सेलच्या बार्शी तालुका अध्यक्ष पदी शकिल मुलाणी यांची निवड

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा बार्शी तालुका अध्यक्षपदी पिंपळगाव (पान) ता.बार्शी येथील शकिल मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,आ.राजेंद्र राऊत, भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे यांच्या हस्ते मुलाणी यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती अनिल डिसले, भाजपा शहराध्यक्ष महाविर कदम, विजय राऊत,अजित बारंगुळे,  संतोष निंबाळकर, बाबा काटे,प्रमोद वाघमोडे,काका काटे, अविनाश मांजरे आदी उपस्थित होते.निवडीबद्दल मुलाणी यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply