October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भाजपाला आणखी एक मोठा धक्का….

जळगाव – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रावादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनीही भाजपचा राजीनामा
देण्याची घोषणा केली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतर निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. या प्रकरणाची तक्रार पुराव्यासहित करण्यात आली
होती. मात्र, भाजपश्रेष्ठींनी याची कोणतीही दखल घेतली नाही. मी देखील आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम करणार आहे, असी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

ज्या व्यक्तीनं 40 वर्ष पक्षनिष्ठेनं काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दु:ख होणं स्वाभाविक आहे. नाथाभाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच चार वर्षांपासून मी तणावाखाली होतो. फडणवीसांनी माझं आयुष्य उध्वस्त केलं आहे. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Leave a Reply