June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बोरगाव खुर्द येथे आर्थिक साक्षरता कॅप

बार्शी ;

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाथरी व विविध कार्यकारी सोसायटी बोरगाव खुर्द ता.बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव खुर्द येथे आर्थिक साक्षरता कॅप घेण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंग अशा सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना गावातच दोन महिन्यांची पगार व हयातीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच सर्व उपस्थित लोकांना अल्पोपाहार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पाथरी शाखेचे मॅनेजर मस्के उपस्थित होते.त्यांचा सत्कार अर्जुन उकिरडे यांनी केला.तसेच आश्रुबा निचळे यांचा सत्कार लाभार्थी धनाजी गायकवाड यांनी केला.
या कार्यक्रमाचे नियोजन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपट केरबा कांदे यांनी कले. या कार्यक्रमास 49 लाभार्थी व अर्जुन उकिरडे, दादा कांदे, आप्पासाहेब कांदे ,गोरोबा कांदे, भारत नागरगोजे व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply