October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बोरगाव (खुर्द) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी डाॅ.लक्ष्मण जाधवर व उपसरपंच पदी संगिता गायकवाड


बार्शी ;
बार्शी तालुक्यातील बोरगाव (खुर्द) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी डाॅ.लक्ष्मण जाधवर व उपसरपंच पदी संगिता दयानंद गायकवाड यांची निवड झाली.ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सरपंच निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आकाश बुरंडे व एम.टी.सोनवणे यांनी काम पाहिले.
  सरपंच व उपसरपंच पदासाठी दोन्ही गटाकडून प्रत्येकी दोन दोन असे चार अर्ज दाखल करण्यात आले होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले.यामध्येच डाॅ.जाधवर व गायकवाड यांची निवड झाली.
#यावेळी ग्रामपंचायत सदस्य रेखा ईश्वरचंद्र जाधवर,पुष्पा पोपट कांदे हजर होते.सात सदस्य असलेल्या बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाचे चार सदस्य आहेत.तर विरोधी गटाचे तिन सदस्य आहेत.
यावेळी पॅनल प्रमुख ईश्वरचंद्र जाधवर, दयानंद गायकवाड, जालिंदर ननवरे,मारूती जाधवर,विनोद उकिरडे,आप्पा कांदे,बालाजी गिते,ऐजिनाथ गायकवाड  ,रावसाहेब जाधवर उपस्थित होते.

Leave a Reply