बेकायदेशीर पणे दारू विक्री, एकावर गुन्हा दाखल

वैराग ;महाराष्ट्र स्पीड न्युज
बेकायदेशीर पणे दारूच्या बाटल्या जवळ बाळगल्या प्रकरणी मुंगशी (वा) ता.बार्शी येथील एकावर उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी च्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#चेतन हरिचंद्र क्षिरसागर वय 25वर्ष रा मुंगशी(वा) ता बार्शी असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
#पो शि बाळकृष्ण मुठाळ नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी यांचे मार्गदर्शनाखाली अवैद्य धंद्यावर कारवाई करणे करिता वैराग पोलीस ठाणे हद्दीत खाजगी वाहनाने सोबत संदेश पवार , पो शि माने असे मिळुन पेट्रोलींग करत करत असताना ते मुंगशी(वा) येथे आले असता बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुंगशी ते मोहोळ रोडला मुंगशी पासुन अंदाजे एक कि मी अंतरावर हरिचंद्र रामभाऊ क्षिरसागर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या समोर रोडच्या डाव्या बाजुस एक इसम चोरटी देशी-विदेशी दारुची विक्री करित असल्याचे खात्री लायक बातमी मिळाली. तेथे छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम ठिक्याची पिशवी घेऊन बसल्याचा दिसला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव चेतन हरिचंद्र क्षिरसागर वय 25 वर्ष रा मुंगशी(वा) ता बार्शी असे सांगीतले.
त्याच्या ताब्यात असलेल्या ठिक्याच्या पिशवी ची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्या मध्ये देशी विदेशी कंपनीचा दारूचा माल मिळुन आला. याबाबत वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.