बेकायदेशीर जुगार,बार्शीत गुन्हा दाखल

सोलापूर ;
बेकायदेशीर पणे पैशावर जुगार खेळणा-यावर बार्शी शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
#गणेश भारत चराटे वय 37 वर्षे रा. पाण्याचे टाकीजवळ सुभाष नगर बार्शी , फिरोज नुरुद्दीन काझी वय 36 वर्षे रा. गांधी स्टाफ परांडा रोड बार्शी , नितीन शंकर शेंद्रे वय 38 वर्षे रा.संतोषी माता चौक ताडसौंदणे रोड बार्शी व सुऱेश सतिश कुंभार वय 26 वर्षे रा. घोडके प्लट लातुर रोड, बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत
#पो.काॅ. सचिन अंकुश यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस उपनिरीक्षक कर्नेवाड, केकान, माने असे पोलीस ठाणेस हजर असताना पोलीस ठाणेचे लँन्डलाईन चे फोनवर निनावी फोन आला की, बार्शी शहरातील तेलगिरणी चौकातील खुरपे बोळामध्ये एका पत्र्याचे शेडमध्ये काही लोक गोलाकार बसून रम्मी नावाचा जुगार खेळत आहेत. पोलीस सरकारी वाहनाने तेलगिरणी चौकात आले व बातमीचे ठिकाणी पायी चालत गेले असता, तेथे एका पत्र्याचे शेडमध्ये काही लोक गोलाकार करून बसलेले व त्याचे हातात पत्ते असलेले दिसले.त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.