गोरमाळे येथे बुधवारी राष्ट्रीय किसान दिनानिमित्त प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर:- महाराष्ट्र स्पीड न्युज
मधुबन फार्म अँड नर्सरी गोरमाळे व अखिल भारतीय सीताफळ उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी “राष्ट्रीय किसान दिनाचे” औचित्य साधून बुधवार दि. 23 डिसेंबर रोजी मधुबन फार्म व नर्सरी गोरामळे ता. बार्शी येथे सकाळी सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान या विषयक मोफत प्रशिक्षण कार्यक्रम व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला असल्याची माहिती आखिल भारतीय सीताफळ महासंघाचे प्रबंधक प्रवीण कसपटे यांनी दिली.
या कार्यक्रमांमध्ये सिताफळ जातींची निवड, पूर्वमशागत झाडांची लागवड कशी करावी , झाडांची छाटणी कशी करावी तसेच बहार येण्यासाठी उपचार कसे करावे, बहार आल्यानंतर पीक संरक्षणासाठीच्या विविध उपाययोजना कशा कराव्यात, एकात्मिक अन्नद्र्व्ये नियंत्रण कसे करावे यांसह विविध बाबींवर ती प्रात्याक्षिक व मार्गदर्शन शेतकरी बांधवांना करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा संपूर्णपणे मोफत असून covid-19 यासंदर्भातील सर्व बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये सोशल डिस्टंसिंग मास्कचा वापर यांचा पालन करणे व तसेच ज्या शेतकरी बांधवांना या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधून नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.सदर कार्यक्रमचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान आखिल भारतीय सीताफळ महासंघाचे प्रबंधक प्रवीण कसपटे यांनी केले आहे.