बुद्धभुषण बहुद्देशिय संस्थे तर्फे साकत येथे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

सोलापूर;
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साकत ता.बार्शी येथील जिल्हा उपकेंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेविका,आशा स्वंयसेविक,अंगणवाडी सेविका,
मदतनिस, गावकामगार तलाठी, सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सर्व सदस्य यांचा बुध्दभुषण बहुद्देशिय संस्थे मार्फत उलेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा कोव्हीड युद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन जागतिक महिला दिन साजरा साजरा करण्यात आला .
यावेळी डॉ आनंद सगरे, जनाबाई पंडित , आणिता शिंदे, सुनंदा मोरे, सविता ओहोळ आशा स्वयंसेविका, वच्छला वाघ , सुनिता आलाट, सविता मोरे अंगणवाडी सेविका, राणी लोखंड, अन्नपुर्णा मोहिते नागरबाई माने मदतणीस, तसेच गावकामगार तलाठी किरण बरबडे, शिक्षिका सुचिता शंकर बारकुल ,प्रभावती मोरे सरपंच शितल मोरे, स्वाती मोरे, अलका अडटराव ग्रामपंचायत सदस्य अमोल ओहोळ, पालिस पाटील भाऊसाहेब पाटील, कोतवाल वाघमारे ग्रामपंचायत लिपिक इनामदार यांचा यावेेळी कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला .
बुद्धषण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ सोनवणे उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सचिव स्वाती सोनवणे, शोभा खटाळ, कविता काटे, कांताबाई खटाळ, आरती मोरे,सहचिव जोतिराम ओहोळ, राजेंद्र गायकवाड, धन्यकुमार मोरे, पद्मसिंह सपकाळ, ब्रम्हदेव मोरे, दत्तात्रय ओहोळ, मनोज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत घेऊन करण्यात आले.