बिलोलीच्या घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, बार्शीत दलित संघटनांची तिव्र निदर्शने

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
बिलोली (जि.नांदेड) येथे झालेल्या दलित अल्पवयीन बधिरमूक मुलीवर बलात्कार व खूनाच्या घटनेतील सर्व आरोपीना तात्काळ अटक करुन फाशीची द्यावी, अशी संतप्त मागणी सर्व दलित संघटनांनी केली.
येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे बार्शीतील सर्व संघटना एकत्र येत घटनेच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे म्हणाले, पीडित मुलगी दलित समाजातील असून तिला आईवडीलही नाहीत. राज्य शासनाने त्या कुटुंबास 25 लाख रुपयाची आर्थिक मदत देऊन तिचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांस तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. बहुजन मुकी मोर्चाचे तानाजी बोकेफोडे म्हणाले केंद्र सरकार जातीयवादी असून दलितांचे सर्व हक्क हिरावून घेत आहे. केंद्र सरकारला दलितांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणूनच अशा घटनेत वाढ होत आहेत. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी आरोपीना राज्य शासनाच्या नव्या शक्ती कायद्यानुसार लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी केली. यावेळी कॉ. तानाजी ठोंबरे, शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक आंधळकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड, शिवसेनेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनीता जाधव, बहुजन वंचित आघाडीचे विवेक गजशिव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या निदर्शनात नगरसेवक अमोल चव्हाण, संदेश काकडे, माजी नगरसेवक किरण तौर, दलित महासंघाचे संदीप आलाट, निलेश खुडे, सत्यजित खलसे, ओंकार पेटाडे, वैभव काकडे, मातंग एकता आंदोलनाचे नाथा मोहिते, दलित स्वयंसेवक संघांचे राजेंद्र कसबे, भीमटायगर संघटनेचे शंकर वाघमारे, दया कदम, निलेश मस्के, रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष ऍड. अविनाश गायकवाड, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे वसीम पठाण यांच्यासह भीम आर्मी, एल्गार कामगार संघटना, इंटक कामगार संघटना, उडान फाउंडेशन, लहूजी शक्ती सेना, खाटीक समाज संघटना, वंचित बहुजन आघाडी, आदी दलित संघटनासह आनंद चांदणे, योगेश लोंढे, अजय चव्हाण करण खंडागळे, योगेश कांबळे,रोहित अवघडे आदी सहभागी झाले होते.
निवेदन एपीआय ज्ञानेश्वर उदार यांनी स्वीकारले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.