October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बिनविरोध झाल्यास खांडवी ग्रामपंचायतीला  संदिप बालाजी बरडे देणार १लाख रुपये

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

आपल्या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर गावाच्या विकासासाठी एक लाख रूपयांची देणगी देण्याची तयारी गावातील रहिवाशी शिक्षक संदीप बालाजी बरडे खांडवी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावाच्या हिताशी बांधीलकी मानणार्‍या सर्व जेष्ठ व्यक्तिंनी , युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करावा. एकोप्याने आणि समजंस्यपणे एकजुटीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन शिक्षक संदीप बरडे यांनी केले आहे. या आवाहानामध्ये शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या .संदीप बालाजी बरडे यांनी आवाहन केले. आपल्या आवाहानात ते म्हणतात आदर्श गाव होण्यासाठी गावातील सर्वांनी केवळ गावाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. गेली आठ महिने कोरोनामुळे गावात, तालुक्यात ताळेबंदी होती,  उद्योग धंदे ठप्प होते, रोजगार निर्मितीला खिळ बसली होती. अर्थकारण थंडावले होते. तसेच तालुक्यात नुकतीच अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीचेही अपरिमित नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत निवडणूका लढविणे कोणाच्याही हिताचे नाही. गटबाजी, वैयक्तिक मतभेद, भाऊ बंदकी, वैयक्तिक इर्षा, सुडबुध्दीचे राजकारण व खोटा मानपान विसरला पाहिजे. निवडणूकांसाठी होणारा अनाठायी खर्च वाचवला पाहिजे, निवडणूकामुळे गावात निर्माण होणारा नाहक तणाव, अशांतता यांना आळ घातला पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण केवळ बोलके आवाहन करत नाही तर हे विधायक पाऊल गावाने उचलावे यासाठी स्वत:च्या कष्टाच्या कमाईचे एक लाख रूपये ग्रामपंचायतीला देणगी देण्याची तयारी या शिक्षक महाशयांनी दर्शविली आहे.
गावात चांगले रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, सर्व गरजूंना घरकुले, सर्व गरजूंना शौचालय, सुसज्य ग्रामसचिवालय चांगले व्यापारी संकुल, गावात वनीकरण, शुद्ध पाणी पुरविण्याचा प्लान्ट, अशा अनेक सुविधा गावात द्याव्यात. गाव व्यसनमुक्त करावे, गावातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उन्नती करावी, सार्वजनिक लाईटपासून ते वाचनालयापर्यंत आणि चांगल्या व्यायाम शाळेपासून ते करमणूक व प्रबोधन करणार्‍या ग्रामजत्रेच्या आयोजनापर्यंत अनेक विधायक उपक्रम ग्रामपंचायत बिनविरोध करून साध्य करता येईल असे शिक्षक संदीप बरडे यांनी म्हणले आहे.

Leave a Reply