March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बिडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का,हा माजी आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर

बीड – जळगाव महापालिकेत सर्जिकल स्ट्राईक करत शिवसेनेने भाजपच्या गडाला भगदाड पाडले आहे. त्यापाठोपाठ आता बीड भाजपमधील माजी आमदार पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी आज जिल्हा बॅंक संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का समजला जात आहे.

भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अगोदरच बॅंकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची पीछेहाट होत असताना दुसरीकडे माजी आमदार थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आंधळे यांनी भाषण सुद्धा केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, प्रकाश सोळुंके, अमरसिंह पंडीत, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे उपस्थित होते.

त्यामुळे भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा असून ते लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply