March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बाळासाहेब माळी यांना आंतरराज्य सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर


बार्शी :

मळेगाव ता.बार्शीचे सुपुत्र व मुबंई येथे रेल्वेत सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे बाळासाहेब माळी यांना कर्नाटक येथील नँशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार महाराष्ट्र, गोवा,व कर्नाटक राज्यातील निवडक व्यक्तींना जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे संपन्न होणार आहे.

बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून केलेल्या,बिनविरोध ग्रामपंचायत,रक्तदान शिबिर,एक गाव एक गणपती,राज्य शासनाचा प्रथम तंटा मुक्त पुरस्कार,निराधार लोकांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जेवण,महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवार अभियान राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार,शिवाजी तरुण मंडळाच्या माध्यमातून गरजू लोकांना केलेले आर्थिक साहाय्य,जि.प.शाळेला डिजिटल साठी मंडळाच्या माध्यमातून केलेली आर्थिक मदत आदी सामाजिक कामामध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत* *बाळासाहेब माळी यांना अंतर राज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला, हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल*

श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच संजयकुमार माळी,माजी सरपंच गुणवंत मुंढे,उपसरपंच धीरज वाघ,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,उद्दोजक राजकुमार मुंबरे,माजी सरपंच संतोष निंबाळकर, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,,यशोदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक रशीद कोतवाल,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,ग्रा.प.सदस्य प्रल्हाद दळवी प्रकाश गडसिग, समाधान पाडुळे,माळी सेवा संघाचे उपअध्यक्ष गणेश बारडे,श्रीमंत पाडुळे,यशवंत गाडे,आदींनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या

Leave a Reply