October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बालदिनानिमित्त बार्शीत निबंध स्पर्धेचे आयोजन

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

नोव्हेंबर बालदिनानिमित्त भारतीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निंबध स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.निबंध स्पर्धेचे विषय १) कोरोना काळातील योध्दे २) गर्जा महाराष्ट्र माझा असे असुन स्पर्धकांनी निंबध ५०० ते ७०० शब्दात सुंदर अक्षरात लिहावा.स्पर्धेची फी २० रु असुन विजेत्यांना ७००,५००,३०० व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येतील.स्पर्धकांनी आपला निंबध भारतीय विद्यार्थी काँग्रेस,कसबा पेठ,लिंबुवाली सवारी जवळ,बार्शी या पत्त्यावर पोस्टाने १३ तारखेच्या आत फी सहित पाठवावे.स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.या स्पर्धेत इ.१ ली ते १२ वीतील विद्यार्थ्यांना भाग घेता येईल.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावे असे जिल्हाध्यक्ष आरबाज पठाण यांनी सांगितले.

Leave a Reply