June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी- सोलापूर रस्ता रुंदीकरणादरम्यान होतेय चक्क शासकीय मातीची विक्री…

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सोलापूर-बार्शी रुंदीकरण कामादरम्यान बार्शी जवळील घोर ओढ्याच्या नजिक चक्क सरकारी मातीची खुलेआम विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
   याबाबत प्राप्त माहिती अशी की सध्या बार्शी ते सोलापूर दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम यंत्रसामुग्रीच्या मदतीने सुरू आहे.जुन्या रस्त्याची शासकीय माती चक्क पैसै घेऊन विक्री सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
खाजगी टिप्पर मधुन 1200/- रुपये दराने सरकारी मातीची खुले आम विक्री चालू आहे.संबंधितांना सरकारी माती विक्रीचा अधिकार आहे का? सरकारी रस्त्याची माती विकणे योग्य आहे का? महसुल प्रशासन याबाबत नेमकी कोणती भुमिका घेणार? याबाबत जनतेमधुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.संबधित यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सरकारी माती विक्री होत असल्याची बाब समजताच कांही लोकानी घटनास्थळी जाऊन सरकारी माती विक्रीच्या दराची चौकशीही केली.त्यामुळेच ही बाब उजेडात आली.

Leave a Reply