March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी शहर पोलीसांकडुण मोबाईल चोरीच्या गुन्हयाचा छडा “भाभी’ गॅगचा पर्दाफाश

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

मोबाईल चोरीची माहिती प्राप्त होताच शहर पोलिसांनी तातडीने यंत्रणा राबवत दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक करण्यात यश आले.त्यांच्या जवळून  6 लाख 46 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दोघांनाही आज बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना 17 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दीपावली सनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या उद्देश्याने ही टोळी शहरात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की काल शनिवारी दि.
14/11/2020 रोजी दुपारी 03/30 वा. भाजी मंडई बार्शी येथुन मोबाईल चोरीस गेल्याबाबत तक्रार पोलीस ठाणेस येताच लागलीच पेट्रोलींग करीता असलेले पोलीस अंमलदार
यांनी आपली यंत्रणा सतर्क करुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली बाजारपेठेत गस्त करीत असताना एका
संशयीतास हाक मारताच तो पळु लागल्याने त्याचा गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार पोहेकॉ
संताजी आलाट व पोकॉ. रवि लगदीवे यांनी पाठलाग करुन त्यास पकडले. त्याचेकडे चौकशी करीत असताना त्याने त्याचे नांव अहमद नजीर सय्यद रा. आकुलगांव
ता. माढा जि. सोलापूर असे असल्याचे सांगुन त्याचे साथीदार सलीम हसन शेख रा. सदर तसेच
शाहीदा अब्दुल शेख असे चारचाकी कारने बार्शीत आल्याचे सांगत असल्याने शिताफीने इतर दोघांचा
शोध घेवुन त्यांना कारसह ताब्यात घेवुन चौकशी करीत असताना ते असंगत व उडवा उडवीची उत्तरे
देवु लागले त्यांचेजवळ प्रत्येकी 2 मोबाईल फोन मिळुन आले असुन सदर मोबाईल फोनबाबत त्यांचेकडे
चौकशी करीत असताना ते काही एक समाधानकारक उत्तरे देत नसल्याने सदर मोबाईल दिनांक
14/11/2020 रोजी भाजी मंडई बार्शी येथुन चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
यातील आरोपीतांकडे सदर गुन्हयातील गेला माल रेडमी नोट प्रो कंपनीच्या मोबाईलसह इतर 5
वेगवेगळया कंपनीचे किंमती मोबाईल फोन तसेच गुन्हयाचेकामी वापरलेले चारचाकी वाहन असे एकुण
6 लाख 46 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपीतांबाबत अधिक तपास करता, सदर आरोपीत हे “भाभी’ गॅगच्या नावाने प्रसिध्द
असुन सांगली, सातारा, सोलापूर येथील वेगवेगळया शहरांतील आठवडा बाजार तसेच गर्दीच्या
ठिकाणावरुन मोबाईल हँडसेट तसेच दागीण्यांची चोरी करीत असल्याबाबत माहीती प्राप्त झाली असुन,
त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक
अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, धाराशिवकर, पोलीस
निरीक्षक संतोष गिरीगोसावी  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक प्रेमकुमार
केदार, सपोफौ. अजित वरपे, इसाक सय्यद, संताजी आलाट, चंद्रकांत घंटे, गणेश दळवी, अमोल माने, रवि
लगदीवे, ज्ञानेश्वर घोंगडे, रोहीत बागल,  अर्जून गोसावी, अमृता गुंड, मुंढे यांच्या पथकाने केला असुन सदर गुन्हयाचा पुढील
तपास गणेश दळवी हे करीत आहेत.

Leave a Reply