February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी व तांदुळवाडी येथील सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत उल्लेखनीय यश

महाराष्ट्र स्पीड न्युज
तांदुळवाडी व बार्शी(जि.सोलापुर) येथील सुयश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या  या परीक्षेत तांदुळवाडी येथील विद्यालयातील इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेस 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 49 विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले असून एकूण  288 गुणांपैकी 200 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे  23विद्यार्थी आहेत कुमार हर्षवर्धन काशीद याने 252 गुण मिळविले आहेत तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस 17 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 15 विद्यार्थी पात्र ठरले असून 294 पैकी 200 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 5 विद्यार्थी आहेत 180 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 9 विद्यार्थी आहेत कु. राजनंदिनी मिरगणे या विद्यार्थिनीस 264 गुण प्राप्त झाले आहेत
   या विद्यार्थ्यांना अक्षय मोकाशी, किरण मुठाळ, पवार सर श्रीमती बोराडे, श्री भोसले, मुख्याध्यापक प्रदिप शिर्के यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

#सुयश विद्यालय,बार्शी;-
बार्शी येथील सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले
आहे. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 26 विद्यार्थी पात्र
तर पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 79 विद्यार्थी पात्र आहेत व
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कदम भूवन या
विद्यार्थ्यांने 294 पैकी 268 गुण मिळवून सुयश
विद्यालयात प्रथम आला आहे, तसेच सिद्धी बुटे- 254
गुण मिळवून विद्यालयात दुसरी तर नेवरे रितेश- 242
गुण मिळवून विद्यालयात तिसरा आला आहे, व इयत्ता
पाचवी मध्ये भोसले समृद्धी हिने 254 गुण मिळवून
विद्यालयात प्रथम स्थान मिळवले आहे व गोविंद पीठे
236 गुण मिळवून विद्यालयात दुसरा आला आहे व
आदित्य चौरे व विराज बारंगुळे-234 गुण मिळवुन
विद्यालयात तिसरे आले आहेत. तसेच शेख
आफताब(232),खरात आर्यन(222), काकडे
अनिरुद्ध(208), शिंदे तुषार(200), कोल्हे संकेत(196),
राऊत संस्कृती(194),जगताप शुभम(192),कदम
आर्यन(188),गुंड आदेश(186),कदम
श्यामसुंदर(184),कातूरे अजिंक्य(182),मुंढे
पवान(182),करंडे गीता(180) या विद्यार्थ्यांनी इयत्ता
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे.
 
क्रांतिसिंह उकिरडे, शार्दुल कुलकर्णी, राजसिंह लांडे,
नंदिनी केमदारने, प्रेम चाटे, संस्कृती उबाळे, उपरे
अथर्व,यश कुरुंद, अस्मिता बरबडे, मधुंद गाडेकर,
तनिष्का नवले, वैजनाथ धस, श्रुती खाडे, अक्षद लांडे, रुद्र
गव्हाणे, शरण्या पाटील, या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी
शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

उल्लेखनीय यशाबद्दल आ.राजेंद्र राऊत,पंचायत समिती सभापती अनिल डिसले,नगराध्यक्ष  आसिफ तांबोळी,प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे, पर्यवेक्षक संजय पाटील,गटशिक्षणाधिकारी साधना काकडे, विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत जाधव,  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवदास नलवडे,प्रतिभा नलवडे मुख्याध्यापक संदीप येवले यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. या
विद्यार्थ्यांना अमृता खडसरे, सुधाकर चेचे,गजानन देशपांडे,  विजयालक्ष्मी सुरवसे,  माधुरी तोडकरी, संदीप मुंढे, संदीप
शाहीर, वैभव धर्मे यांचे मार्गदर्शन लाभले.Maharashtra SPEED News,SPEED news#Maharashtra update#Maharashtra news#Maharashtra live update#Maharashtra corona#Maharashtra news#corona update#News update#Live news#Live update#latest update,Maharashtra Update,


Leave a Reply