October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी पोलिसांनी पर्स चोरट्यास केले जेरबंद,एक लाख 89 हजाराचा मुद्देमाल हस्तगत,चोरटा उस्मानाबाद जिल्ह्यातील

बार्शी ;

बार्शी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेवुन सोन्याच्या
दागीण्यांचे पाॅकेट चोरणा-या चोरट्यास बार्शी पोलिसांनी जेरबंद करूण 1 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Advertisement

#सनी ऊर्फ शिवसनी वसीष्ठ काळे वय- 24 वर्षे रा. इंडीरानगर झोपडपट्टी, भूम ता. जि. उस्मानाबाद असे याप्रकरणात अटक करुण पोलीस कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की
बार्शी शहरात दिनांक 17/02/2021 रोजी 09/00 वा. चे सुमारास बस स्थानकात बसमध्ये चढणा-या विदया अविनाश देवणे वय- 52 रा. ससाणे नगर, अमित हाईटस हडपसर,पूणे या महीलेच्या पर्सची चैन उघडुन त्यातील सोन्याचे दागीणे असलेले लहान पाकीट चोरीस
गेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला होता.
  बार्शी शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अंमलदार यांनी आपली यंत्रणा सतर्क करुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तांत्रीक बाबींची पडताळणी करता सदरचा संशयीत हा रेकॉर्डवरील
गुन्हेगार असल्याचे आढळुन आल्याने सदर संशयीत आरोपीचा माग काढुन रात्रंदिवस पाळत ठेवुन सनी काळे यास  ताब्यात घेतले.

त्याला पोलीस खाक्या दाखवून त्याच्या गुन्हयाचा
तांत्रीक बाबीनिशी आरसा दाखविताच त्याने सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केला.
गुन्हयातील चोरलेला माल व त्याचे इतर साथीदार याबाबत प्राथमीक तपास करता तो उडवा
उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कोठडी मंजुर केली असुन रिमांड मुदतीत त्यास विश्वासात
घेवुन तपास करता त्याने सदर गुन्हयात चोरलेला संपूर्ण माल 1,89,000/- रु. त्यात  30
ग्रॅम सोन्याचे गंठण व दोन वाटया असलेले, 12 ग्रॅमचे सोन्याचे मोहन माळ पेंडल असलेले
असा काढुन दिल्याने तो गुन्हयात हस्तगत केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस
अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी  धाराशिवकर यांचे
मार्गदर्शनाखाली पो.नी. संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे
सपोनी उदार, पोलीस उप निरीक्षक ननावरे, इसाक
सय्यद,  सहदेव देवकर, चंद्रकांत आदलींगे, चंद्रकांत घंटे, ज्ञानेश्वर घोंगडे,  बारगीर यांच्या पथकाने केला.

Leave a Reply