October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी न्यायालयासमोरूण दोन आरोपींचा पलायनाचा प्रयत्न, दोघांवर बार्शी त गुन्हा दाखल,दोन्ही आरोपी पांगरी पोलिसांच्या ताब्यातील


बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

दुचाकी  मोटार सायकलसह मोबाईल चोरी प्रकरणात पांगरी पोलिसांकडुण अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींनी आज बार्शी न्यायालय परिसरातुन पोलिसांच्या तावडीतून  पलायन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.दरम्यान गणेश भोळे व भोला आडसुळ या तरूणांनी प्रसंगावधान दाखवून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या तर एका आरोपीचा पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले.दरम्यान दोन्ही आरोपींवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#सचिन शुभाष शिंदे वय २४ व तुषार जयदेव मगर वय २४ दोघे रा.उपळे दु.ता.बार्शी अशी पोलिसांच्या ताब्यातुन पळुन जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा व पांगरी पोलिस  यांनी संयुक्त कारवाईत आरोपी  सचिन
सुभाष शिंदे वय २४ वर्षे रा उपळे (दु) व अजय सुनिल भोसले वय २३ वर्षे रा धनेगाव ता तुळजापुर जि उस्मानाबाद
यांना ताब्यात घेतले होते.त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांचेकडे चार मोटार सायकल व १० पावत्या नसलेले
चोरीचे मोबाईल मिळुन आले होते.त्यांचे जवळील मोटार सायकलबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास केला
असता ती पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील ममदापुर ता बार्शी जि सोलापुर येथील असल्याचे उघडकिस आले होते.
त्यानंतर पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल यांनी पांगरी पोलीस ठाणेस दाखल गुन्हयामध्ये
वरील दोन आरोपीना वर्ग करून घेवुन अटक करून त्यांचेकडे तपास केला असता आरोपींनी व त्यांचे इतर साथीदार
यांनी मिळून विविध ठिकाणावरून मोटार सायकल व मोबाईल चोरी केली असल्याचे सांगितले होते.
   हवालदार शैलैश चौगुले व पांडुरंग मुंढे यांनी उपळे दुमाळा येथुन तुषार जयदेव मगर वय २० वर्षे यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांने पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील नारी येथील देखील एक मोटार सायकल साथीदारांच्या मदतीने चोरल्याचे सांगितले होते.
त्यास देखील सदर
गुन्हयामध्ये अटक करूण दि.२० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी
देण्यात आली. सदर आरोपीतांकडुन एकुण ४ मोटार सायकली व १० मोबाईल हॅन्डसेट चोरी केल्याचे निष्पन्न
झाल्याने जप्त करण्यात आले होते .
###आज बुधवारी दि.२१ रोजी पांगरी पोलिस ठाण्याचे हवालदार सतिश कोठावळे, तानाजी डाके,तडवी, घुले, क्षिरसागर हे शिंदे व मगर या दोन्ही आरोपीस बार्शी न्यायालयात घेऊन आले होते.न्यायालयीन कामकाज संपवुन आरोपीना सरकारी गाडीत बसवत असताना आरोपींनी पोलिसांना हिसका देऊन पलायन केले.आरोपीच्या हातात बेड्या नसल्याने पळुन जाण्याचा मार्ग सोपा झाला होता.

Leave a Reply