June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी न्यायालयातून वकिलाची दुचाकी लंपास

बार्शी:- महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

चोरट्याने बार्शी येथील न्यायालयाच्या आवारातुन चक्क वकिलाच्याच 35 हजार रूपये किंमतीच्या दुचाकीवर डल्ला मारूण दुचाकी लंपास केल्याचा प्रकार भर दिवसा घडला.

अॅड. अभिजीत जालिंदर जगताप वय.23 वर्षे, रा .पांगरी ता. बार्शी जि. यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते बार्शी कोर्टात ज्युनियर वकील म्हणुन काम पाहत आहे सदरचे उत्पन्नावर कुटुंबाचा उदर्निर्वाह करतात.

सकाळी 10/30 वा चे सुमारास त्यांनी बार्शी कोर्टात त्यांच्या मालकीची काळ्या व लाल पांढरा पट्टा असलेली एच एफ डीलक्स -MH 13 DB 1674 ही हॅन्डल लॉक करुन कोर्टाच्या आवारात लावली होती.ते कामानिमीत्त कोर्टाचे आत गेले व  काम करुन त्यांना सोलापुर येथे जायचे असलेने ते 12/30 वा बाहेर येवुन ज्या ठिकाणी माझी गाडी पार्कीग केली होती त्याठीकाणी येवुन पाहीले असता  तेथे दुचाकी नसलेचे लक्षात आले. सदर गाडीचा आजुबाजुला व बार्शी शहरात इतर ठिकाणी शोध घेतला परंतु गाडी मिळुन आली नाही. यावरुन खात्री झाली कि, लॉक करुन कोर्टासमोर लावलेली गाडी ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रूपेश शेलार हे करत आहेत.

Leave a Reply