June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी नाटयपरिषदेची कामगार व कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे व मुंबईच्या अ.भा.मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या
आवाहनाला प्रतिसाद देत अ.भा.मराठी नाट्य परिषद बार्शी शाखेच्या वतीने “कोरोनाग्रस्त”
व नाट्य क्षेत्रातील पडदयामागील वेशभूषाकार, मेकअपमन रंगमंच कामगार,
वाहनचालक व अन्य गरजू कामगारांना बार्शी शाखा कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने
आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
चीनमधील वूहानपहरात उगम पावलेला कोरोना या संसर्गजन्य महामारीचे साम्राज्य
सर्वदूर पसरलेले आहे. जग,देश व राज्य थोडक्यात सर्व मानवजातच संकटात सापडलेली
आहेत. “टाळेबंदीमुळे” अनेकांच्या हाताला काम नाही. हातावरचे पोट असणा-यांना
रोजच्या भाकरीचा प्रश्न भेडसावत आहे. अनेकांचे प्रपंच आज अन्न व निवा-याविना दोरी
तुटलेल्या पतंगासारखे भरकटत आहेत. अशा कठिण परिस्थितीत बार्शी  नाट्य परिषदेने
आर्थिक सहकार्य करून आपली सामाजिक बांधीलकी सिध्द केली आहे.
पंतप्रधान निधी रू.५०००/-, मुख्यमंत्री निधी रू. ११०००/- व बार्शी शाखेच्या १८१
सभासदाकडून १ रूपया ही न घेता प्रत्येक सभासदाच्या नावे रूपये १०० प्रमाणे
१८१००/- रूपयाचा निधी पडदयामागे काम करणा-या कामगारासाठी मुंबईच्या अ.भा.
मराठी नाट्य परिषदेकडे पाठविलेला आहे.
सोमेश्वर घाणेगांवकर, राजा माने, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल जोशी, सूर्यकांत
वायकर, आकाश पाटील, सतिश होनराव, राहूल माढेकर, नागेश गाभणे, प्रा. सौ. विजयश्री
पाटील, प्रा. सौ. माधुरी शंदे, सौ. ममता चोप्रा व सौ. वंदना देवणे यांच्या आर्थिक
सहकार्यातून जमलेल्या रू. ३४,५००/- निधीचे वाटप वरीलप्रमाणे केल्याचे मत बर्शी
नाट्य परिषदेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगांवकर यांनी व्यक्त केले.

Advertisement

Leave a Reply