बार्शी नगरपालिकेच्या वतीने विना मास्क लोकांकडुण दंड वसूल

बार्शी ;
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशान्वये बार्शी नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य विभागामार्फत बार्शी शहरातील दुकाने, बाजारपेठा मधील फळ विक्रेते, दुचाकी वाहन धारक विना मास्क बाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी उघडयावर कचरा टाकणा-यां नागरिकांकडून र.रु. 28,400/- इतका दंड वसूल करणेत आलेला आहे.
तसेच उपळाई रोड व ढगे मळा भागातील मंगल कार्यालयावर 50 व्यक्तीपेक्षा जास्त गर्दी, विना मास्क, सोशल डिस्टंस नसल्याने संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मुख्याधिकारी अमिता दगडे–पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करुन उपमुख्याधिकारी ज्योती मोरे, स्वच्छता निरिक्षक शब्बीर वस्ताद, नितीन शेंडगे, हर्षल पवार, मुकादम दिपक ओव्होळ, नागेश कांबळे, अतिश रोकडे यांचेसह दंडात्मक पथक यांनी सदरची कारवाई केलेली आहे. शहरातील सर्व व्यवसाय धारकांनी शासनाचे कोरोना या संसर्गजन्य रोगास प्रतिबंध करणे करिता सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे,अन्यथा सबंधितावर कायदेशीर कारवाई करणेस भाग पाडू नये असे आवाहन मुख्याधिकारी अमिता दगडे–पाटील यांनी केलेले आहे.