March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यासाठी 2 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या 84 विहीरी मंजूर — आमदार राजेंद्र राऊत.

              
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020 – 21 अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून 2 कोटी 52 लाख  रूपये किंमतीच्या 84 विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. राजेंद्र राऊत यांनी दिली.

या योजनेचा लाभ तालुक्यातील चिखर्डे, मालवंडी, बाभुळगाव, हत्तीज, पिंपरी पा. सासुरे, यळंब, कुसळंब, बोरगांव झा, चिंचोली, उपळे दु. धामणगाव दु. कांदलगांव, कव्हे, नारी, तावडी, घाणेगांव, कासारी, पिंपळगाव धस, खडकलगांव, कोरफळे, रातंजन, गौडगांव, भातंबरे, भालगांव, पानगांव, सर्जापूर, सुर्डी, वैराग, वाणेवाडी, गुळपोळी, उंडेगांव, धोत्रे, बोरगांव खु.आगळगांव, तांबेवाडी  या गावांतील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.
  यावेळी पंचायत समिती सभापती अनिल  डिसले, पं.स.उपसभापती मंजुळा वाघमोडे, माजी जि.प. सदस्य संतोष  निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, पंचायत समिती सदस्य अविनाश मांजरे,  इंद्रजित चिकणे,  राजाभाऊ धोत्रे, उमेश बारंगुळे,सुमंत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply