October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील शेळके व काळदाते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

बार्शी (गणेश गोडसे)

बार्शी तालुक्यातील बेलगाव व येळंब येथील दोन सुपुत्रांनी खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.बेलगाव येथील बापुसाहेब शेळके व येळंब येथील शाहू पोपट काळदाते अशी नुतन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या दोन सुपुत्रांची नावे आहेत.
#बेलगाव येथील बापुसाहेब शेळके हे 2010 मध्ये मुंबई येथे पोलीस दलात भरती झाले होते.तेथुन ते उस्मानाबाद येथे बदलुन आले.बापुसाहेब शेळके यांनी सेवा बजावत असताना राजमाता प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून गडकोट चळवळ,सामाजिक उपक्रम राबवत समाजात सामाजिक विचारांची पेरणी केली.

Advertisement

     #शाहु काळदाते हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते.पांगरी येथील सेवेनंतर त्यांची  नातेपुते येथे बदली झाली.ते सध्या नातेपुते येथे सेवा बजावत आहेत.

@@@दिनांक 10 सप्टेंबर 2017 रोजी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा झाली होती. ती परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिनांक24 डिसेंबर 2017 रोजी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा होऊन सदर परीक्षेची शारीरिक चाचणी परीक्षा दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 15 जानेवारी 2021 दरम्यान झाली सदर परीक्षेचा निकाल दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी लागला.

काळदाते यांना मुख्य परीक्षेला 300 पैकी 258 व शारीरिक चाचणी परीक्षेला  100 पैकी 99 गुण मिळाले.ते एकूण 357 गुण घेऊन महाराष्ट्रातून बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.या परिक्षेसाठी राज्यातील 4529 उमेदवार बसले होते.
   शेळके व काळदाते यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply