October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील भोयरेत एकाच रात्रीत पाच घरे फोडली

बार्शी;
  घराला बाहेरून कडी लावून  भोयरे ता.बार्शी येथे एकाच रात्रीत पाच घरफोड्या करूण सोन्या चांदिचे व रोख रक्कम लंपास केले.

Advertisement

#रमेश हरि गात वय-50 रा-भोयरे ता बार्शी यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की रोजी रात्री 11.00 वा चे सुमारास ते जेवन करुन झोपी गेले.पहाटे 03.00 वाजण्याच्या  सुमारास ते
उठले. त्यावेळी ते झोपलेल्या खोलीला बाहेरुन कडी लावलेली होती.म्हणुन शेजारी राहणा-या जयश्री देशमुख यांना फोन केला व फोनवर घडलेला प्रकार सांगितला नंतर जयश्री देशमुख या घरारामोर आल्या व त्यांनी हाक मारली व
दरयाज्याला लागलेली कडी उघडली.नंतर ते व  पत्नी घराच्या बाहेर आले. नंतर शेजारील कुलुप लावलेल्या खोलीचा दरवाजा एका बाजुने उघडा दिसला. नंतर सदर खोलीचे कुलुप उघडुन आत जावुन पाहिले असता घरातील लोखंडी पेटी उघडी दिसली.पेटी उघडी दिसल्यामुळे पेटीतील सामान पाहिले असता पेटीतील सोन्याचे गंठण व फुले झुबे व साड्या दिसल्या नाहीत
कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदरचे दागिने व साड्या या चोरुन नेल्या.
चोरट्यांनी 30,000/- रुपये किमतीचे एका तोळा वजनाचे सोन्याचे गंठण व फुल झुबे
, 25,000 रुपये किंमतीच्या एकुण 25 साड्या किंमत , शेतीचे खरदेखत व इतर कागदपत्र असा
55,000/- रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.

तसेच गावातील श्रीराम दादासाहेब मुंढे यांचे खडी क्रेशर
बरिल वाॅचमन खोलीचा कडी कोयंडा तोडुन त्यामधील डिझेलचे कॅन्ड व प्रेमा प्रताप पाटील यांचे धरातील साड्या किराणा सामान व रोख रक्कम चोरीस गेल्याचे तसेच सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
महारूद्र दादासाहेब मुंढे यांच्या शेतातील खोलीचे कडी कोयंडा तोडुन बोअरची पेटी
उचकटून चोरीचा प्रयत्न केला. नितीन उध्दव पाटील यांच्या नविन बंगल्याचे समोरच्या दरवाजाचा कोयंडा तोडला आहे व बेडरुमच्या दरवाजाचे लॉक तोडले आहे. घटनास्थळी हवालदार राजेंद्र मंगरूळे यांनी भेट देऊन पहाणी केली. अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply