June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करा,अन्यथा बोंबाबोंब आंदोलन;शेतक-यांची मागणी

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावे अशी मागणी बार्शी तालुक्यातील शेतक-यांनी एका लेखी निवेदनाद्वारे बार्शी तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की बार्शी तालुक्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.मात्र 14 ऑक्टोंबर 2020 रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे 60 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले होते. व नदीकाठील, वड्या शेजारील पिकाचे 70 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.
        बार्शी तालुक्यातील पावसाच्या नोंदींनुसार तालुक्यात अतिवृष्टी झाली होती, त्याच मुळे राज्य शासनाने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी ची मदत जाहीर केली होती. व ते अनुदान शेतकऱ्यांना दिपवाळी सणाच्याआधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल असे आदेशही दिले होते.
    पण आज दिवाळीसण संपला आहे, तरीपण शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेली नाही.
तरी  तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीची अनुदान सोमवार पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही तर तालुक्यातील शेतकरी दिनांक 24. 11. 2020 रोजी तहसील कार्यालय बार्शी येथे बोंब मारो आंदोलन करतील असेही निवेदनात म्हटले आहे. .
    यावेळी राहुल भड, प्रभाकर कापसे,
दिपक जाधव,बबिता काळे  आदी शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply