October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील नदींवरील पुलासाठी 13 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर,आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांनाला यश

बार्शी ;

बार्शी तालुक्यात गत दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गावांना जोडणारे रस्ते व त्या रस्त्यांवर असलेल्या नदीवरील जुने पूल अतिशय धोकादायक व खराब झाले. या खराब झालेल्या पुलांमळे वाहतुकीस अडचण निर्माण होवून या ठिकाणी नागरिकांचे होणारे दळणवळण हे धोकादायक बनले होते. त्यातून मनुष्यहानी होण्याची स्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील या परिस्थितीचा विचार करून आ. राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे ,  उपमुख्यमंत्री अजित  पवार  व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांच्याकडे पत्रव्यवहार करून तालुक्यातील धोकादायक बनलेल्या नदीवरील पूल बांधकाम करण्यासाठी जवळपास अंदाजित रक्कम 14 कोटी रुपयांची मागणी केली होती.

नदीवरील पुलांची नावे व मागणी केलेली अंदाजित रक्कम पुढील अशी ; खामगाव ते यळंब रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधणेकरीता अंदाजित रक्कम 2. 50 कोटी रुपये, वैराग ते धामणगाव रस्त्यावरील नागझरी नदीवर नवीन पूल बांधणे करिता अंदाजित रक्कम 3.80 कोटी रूपये, घाणेगाव ते साकत रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2. 50 कोटी रुपये,घाणेगाव ते साकत रस्त्यावरील भोगावती नदीवर नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2.50 कोटी रुपये, कापसी ते सावरगाव या रस्त्यावरील खडकी नाला येथे नवीन पूल बांधणे अंदाजित रक्कम 2.10 कोटी रुपये.

Advertisement

निधीसाठी आ. राऊत यांनी शासन दरबारी  पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ए.डी.बी. टप्पा 2 अंतर्गत तालुक्यातील वरील कामांना प्रशासकीय मान्यता मिळून 13 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Leave a Reply