‘मुक्या जितराबाला पाणी देता का पाणी’, बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथिल दिगंबर रणखांब यांनी विजतोड मोहिम,शेतकरी,पाळीव प्राणी यांची मांडलेली व्यथा त्यांच्याच शब्दात..

चिखर्डे ; महाराष्ट्र स्पीड न्युज
आज दिनांक 24/3/2021 वार बुधवार चिखर्डे गावात पाण्यासाठी कृष्णा शंकर सवणे यांचे शेतात त्यांचा पशुधनाची झालेली न पाहवणारी हेळसांड ////त्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही पण आमच्या डोळ्यात पाणी आणलं ह्या व्यावासत्तेने////आम्ही चालू सरकारचे हितचिंतक असलो तरी आम च्या बळीराजाची जिथं कदर होत नाही त्यांना आम्ही फाट्याने मारतो
—-–————————————————————मायबाप सरकार आणि विद्युत पुरवठा अधिकारी तुम्ही जर माझा शेतकऱ्याचा अंत पाहून माझा मुक्या जीतराबांचा प्राण्याचा इतका पण जीव घेत असाल तर माझा शेतकऱ्याने आणि माझा पसुधनाने पिकवलेले खाता ना की शहरातील सार्वजनिक सुलभ सैउच्यालयातील विस्टा खाता का ?
सर्व लॉकडाऊन असताना फक्त आणि फक्त शेती इंडस्ट्री चालू होती म्हणून तुम्ही दोन घास खाता
खाऊन दाखवा तुमचा इंडस्ट्रीत तयार झालेली लाईट तुमचा आम्ही जाहीर निशोध करतो
सोडायची असेल तर सोडा नाहीतर कायमची बंद करून टाका तुम्हाला विनंती पण करायची गरज नाही अमीच आमचे वैरी झालोत पाण्याच्या शोधात आम्ही 500/500फूट खोल बोअर घेतलेत कातर उत्पन्न वाढवायचं आणि ही नुसता उपटसुळ पोसायची आम्ही आमच्या पाशुधानापुरते व आमचा पुरते पिकवून निवांत बसून खाऊ शकतो आणि अनलेच मनात तर तेही करूच !
एकतर रब्बी पिकाच्या काढणीची कामे चालू आहेत माझा शेतकऱ्याला तहान लागत असेल माझा मुक्या जनावरांना ज्वारीच्या गाडया ओढून तहान लागत असेल पण तुम्ही नाहीत सोडणार कातर तुमचे पूर्वज शेतकरी नव्हते ना फक्त टॅक्स वाचवण्या साठी तुम्ही शेतकरी असता कागदावरच
आज जर जनावरांसाठी 1 तास लाईट नाही सोडली तर आम्ही चिखर्डेकर 1 रुपया पण बिल नाहीत भरणार पशुधन कसं वाचवायचा ते ठरू आम्ही आमच्याकडे बैलगाडी आहे ते घेऊन तलावावर जाऊ गाडीत सोबत गाडीत एखादे 500लिटरच टिपाड नेहू
पण आम्ही नाही पिकवले तर तुम्ही वरी म्हणल्याप्रमाणे खाणार का? आम्ही आमच्या पशु धनाचा विचार करतो आमचे पीक जळले तरी चालेल ते एका सीजन पुरते मर्यादित असते पण ते पशुधन कायमचे सोबती असते आमचे जीवनासाठी त्यांचा मोलाचा वाटा असतो बळीराजाचे सगळ्यात कामात खांद्याला खांद्याला लावणारा साथीदार म्हणजे बैल