बार्शी तालुक्यातील चिंचोलीत लक्ष्य करिअर अकॅडमीचा पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ..

सोलापूर; (गणेश गोडसे )
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन नक्कीच केले जाईल.मोठ मोठ्या अधिका-यांचे मार्गदर्शन उपलब्ध करूण दिले जाईल.आपल्या भागातील मुले भरती व्हावी या उदात्त हेतुने ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले.ते चिंचोली ता.बार्शी येथे लक्ष्य करिअर अकॅडमीच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे,तहसिलदार शिवाजी शिंदे,प्रा.विशाल गरड,वित्त व लेखाधिकारी डाॅ.वैभव राऊत, पो.नी.हर्षवर्धन बारवे,सपोनी सुधीर तोरडमल, अॅड.अनिल पाटील, उद्योजक संतोष शिंदे,सरपंच गजराबाई शिंदे,अशोक मुंढे,पोलिस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट,नुतन पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे,लक्ष्य अकॅडमीच्या अध्यक्षा मणिषा शिंदे ,दिलिप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक शिंदे पुढे बोलताना म्हणाले की गावाचा विकास होण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होणे आवश्यक असते.तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी आपल्या भागातील मुलांसाठी भरती प्रक्रियेची नामी संधीच या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे.येथे प्रशिक्षण घेणारा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होईल असा आशावादही शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला .
तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात गरिबांची मुले पोलीस, सैन्यात भरती व्हावी,ग्रामीण भागातील मुलांचीही प्रगती व्हावी या हेतूने आपन ना नफा ना तोटा तत्वावर ही अकॅडमी चालवणार असुन शिस्तीचे बंधन मात्र काटेकोर असणार आहे असे सांगितले.
यावेळी ईतर मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले.सुत्रसंचालन उदय पाटील यांनी तर आभार उद्योजक संतोष शिंदे यांनी मानले.