December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील गोरमाळेत ट्रॅक्टर चालकास मारहाण

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
शेतातुन ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकास लाकडी काठीने मारहाण करून चावा घेऊन जखमी करत ट्रॅक्टर चे नुकसान केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे घडला.

Advertisement

#गजेंद्र मोरे, त्याची पत्नी गयाबाई मोरे व मुलगी शितल परमेश्वर गपाट तिघेही रा.गोरमाळे ता.बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#विशाल मुकुंद मोरे ,वय 21 वर्षे,  रा-गोरमाळे, ता.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सकाळी 10/00 वाजणेचे सुमारास ते गोरमाळे ते पांगरी जाणारे रस्त्याचे पुर्वेस एक किलोमीटर अंतरावर असलेल्या  शेतात कामानिमीत्त व शेतातील वैरण आणेणेकरीता महिंद्रा कंपनिचा अर्जुन टक्टर घेउन गेले होते.सायंकाळी 06/30 वाजणेचे सुमारास शेतातील काम आवरुन नेलेल्या टॅक्टरमधे वैरण भरुन  गावातील गजेंद्र संगीत मोरे यांचे शेताचे बांधावजवळुन टॅक्टर घेऊन घरी जात असताना परमेश्वर कालीदास गपाट याचे घरासमोर आलो असता गजेंद्र मोरे व त्याची पत्नी गयाबाई मोरे यांनी टॅक्टर थांबवुन गजेंद्र मोरे याने विचारले की,तु टॅक्टर माझे शेतातुन का आणला असे म्हणुन  ते दोघेही शिवीगाळ करु लागले. त्या वेळी फिर्यादी त्यांना म्हणाले की,माझी चुक झाली, मला माफ करा.तेव्हा गजेंद्र मोरे यांनी  तेथे असलेल्या लाकडी काठीने मारहाण करणेस सुरवात केली.त्यावेळी गजेंद्र मोरे यांची मुलगी शितल परमेश्वर गपाट ही पण  जवळ येउन  शिवीगाळ करत हाताने मारहाण करुन फिर्यादीस उजव्या हाताचे अंगठ्याजळील बोटाला चावली व त्यांच्या अंगातील कपडे फाडले. त्याच वेळी गजेंद्र मोरे व गयाबाई मोरे यांनी  महिंद्रा कंपनिच्या अर्जुन टक्टरचे मडगार्ड वर दगडे घालुन फोडुन  टक्टरचे अंदाजे 05 हजार रुपयाचे नुकसान केले आहे.तसेच गजेंद्र हा  म्हणाला की,माझ्या मुलाला पूण्यावरुन पोर घेउन यायला सांगुन तुला बघुन घेतो अशी धमकी दिली.याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply