February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील अणेक गावात जनजागरण फेरी


बार्शी ;
  बार्शी तालुक्यातील अणेक गावात ग्रामपंचायत व स्थानिक शाळा यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार माझा गाव कोरोनामुक्त गाव व मतदार जनजागृती रॅली निमित्त जनजागरण फेरी काढण्यात आली.
#पांगरी;-
पांगरी ता.बार्शी येथील शिवछत्रपती विद्या मंदिर प्रशाला व पांगरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात फेरी काढण्यात आली.रॅलीचा शुभारंभ जि.प.शाळेसमोरूण तर समारोप पांगरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आला.फेरीमध्ये शिवछत्रपती  विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना डोके,जि.प.मुख्याध्यापीका शैला कुलकर्णी,बालाजी चौधरी,शकुर इनामदार, व्ही .के.घावटे,पि.व्ही.नलवडे,अनिल वळसंगे, नझरोद्दीन काझी,उमेश जगदाळे,रामलिंग वाघमारे,एस.एम.हक्के, गणेश काळे,गणेश जाधव,रमेश गोडसे आदी सहभागी झाले होते.
#जामगाव;
जामगाव ता.बार्शी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांना सहभागी घेत गावात मतदार जनजागृती व 5 वी ते 8 वी शाळा सुरू जनजागरण बाबत फेरी काढण्यात आली.या फेरीमध्ये जि.प.शाळा,हायस्कुल, अंगणवाडी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी ग्रामसेवक आर.एन.माळवे,पांडुरंग यादव,आर.बी.आडसुळ यांच्यासह शिक्षक, आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका आदी सहभागी झाले होते.

Advertisement

#जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशा नुसार गुळपोळी ग्रामपंचायत व हायस्कूल यांचे वतीने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली..
माझे गाव कोरोनामुक्त गाव , राष्ट्रीय मतदार दिवस आणि इयत्ता 5 ते 8 वर्ग सुरु करणे इत्यादी विषयी जनजागृतीपर संदेश देण्यात आले..
या प्रभातफेरीत हायस्कुल , जि प प्रा शाळा, माळी वस्ती प्रा शाळा चे सर्व शिक्षक आणि कर्मचारी, सर्व आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, प्रतिष्ठित नागरिक,  तलाठी व ग्रामसेवक सहभागी झाले होते.
प्रभातफेरी झाल्यानंतर करोना मुक्त झालेल्या कोरोना योद्धा चा सत्कार करण्यात आला…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक वैभव माळकर , प्रशासक सोमनाथ शिंदे , माजी सरपंच दत्तात्रय काळे, माजी उपसरपंच परमेश्वर मचाले, पोलिस पाटील बाळकृष्ण पिसे, कुमार चिकणे, कृष्णा चिकणे, शिरीष चिकणे आदींनी परिश्रम घेतले.

#कासारवाडी;-
कासारवाडी ता.बार्शी येथील जि.प.शाळेत “माझे गाव -कोरोनामुक्त गाव”अभियान व राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
    प्रारंभी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सरपंच ,उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
    यावेळी माझे गाव कोरोनामुक्त गाव व मतदार दिवस याविषयी प्रबोधन करण्यात आले. तसेच दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून इयत्ता ५वी ते ८वी वर्ग सुरू होत आहेत ,कोरोनाची भीती बाळगू नका पण काळजी घ्या,मास्कचा वापर करा,सुरक्षित अंतर ठेवा,मतदार जनजागृती याविषयी माहिती दिली. प्रभातफेरीनंतर शाळेच्या प्रांगणात सामाजिक अंतर ठेवून समारोप कार्यक्रम घेण्यात आला.

Leave a Reply