October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात वाळुचोरावर गुन्हा दाखल

सोलापूर: महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

वाळुची चोरटी वाहतुक करणा-या एकास चोरीची वाळु व दोन लाखाच्या टेम्पोसह ताब्यात घेतल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील धसपिंपळगाव शिवारात घडला.
#महेश लहु जाधव वय 24 वर्षे रा. उंबर्गे ता.बार्शी असे याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

#मकूंद  माळी वय 27 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.ते बार्शी तालुका पोलीस ठाणे चे हद्दीत बार्शी ते धसपिंपळगाव रोडवर धसपिंपळगावचे शिवारात पेट्रोलिंग करित करित असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, धसपिंपऴगाव कडुन बार्शी कडे एक पांढ-या रंगाचा पाठिमागील बाजुस भगव्या रंगाची 107 टेम्पो विनापास परवाना बिगर रयल्टीची वाळु चोरी करून टेम्पो मध्ये भरून बार्शी चे दिशेने येते आहे.पोलिस बार्शी ते धसपिंपळगाव जाणारे रोडवर धसपिंपळगाव हद्दीत रोडवर थांबले असता. धसपिंपऴगाव रोडवरून  टेम्पो बार्शी कडील दिशेने येत असल्याचा दिसला.
     एम.एच04वी.यु.7001 या टेम्पो पाठीमागील हौदात पाहीले असता. त्यात वाऴु असल्याचे दिसुन आल्याने चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने नाव महेश लहु जाधव वय 24 वर्षे रा. उंबर्गे ता.बार्शी जि.सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्यास टेम्पो मध्ये असलेल्या वाळुची रॉयल्टी पावती बाबत विचारणा केली असता त्याने आपले जवळ पावती नसल्याचे सांगितले व वाळु कोठुन आणली याबाबत विचारणा केली व सदर वाहनाचा मालक कोण आहे असे विचारले असता, त्याबाबत काही एक उपयुक्त माहीती दिली नाही त्यामुळे त्यांने वाळु चोरून विक्रीस घेवून जात असल्याची खात्री झाली.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply