October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी टेक्निकल मध्ये आरोग्य सभापती संदेश काकडे यांचा सत्कार

बार्शी महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे बिनविरोध निवडूण आलेले नूतन सभापती संदेश  काकडे यांचा बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये  सत्कार करण्यात आला . संदेश काकडे हे बार्शी टेक्निकल हायस्कूलचे माजी विदयार्थी आहेत तसेच प्रशालेतील कार्यरत कर्मचारी भिमराव काकडे यांचे सुपुत्र आहेत . सत्कार समारंभाचे प्रस्ताविक उमेश काशीद यांनी केले . तर मुख्याध्यापक टकले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सत्काराला उत्तर देताना संदेश काकडे यांनी या शाळेने व संस्थेने मला घडविले आहे त्यामुळेच आज मला ही संधी मिळाली असल्याचे सांगत . पुढील काळात प्रामाणिकपणे काम करत बार्शीचे आरोग्य चांगले राखू असे सांगीतले . तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर माझा आरोग्य कर्मचारी समाजाचा खरा आयडॉल आहे कारण तो जीवाची पर्वा न करता समाज्यासाठी राबत आहे . व मला या विभागाचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे असे ते म्हणाले . या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते . या कार्यक्रमात सभापती संदेश काकडे यांचे वडील भिमराव काकडे यांचाही सत्कार करण्यात आला .

Leave a Reply