June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी चे सुपुत्र सुभाषचंद्र मांडे यांचे कर्करोगाने. लातूर येथे निधन

विद्यार्थी, नातेवाईक, समाजधुरीण हळहळले

बार्शी;
स्वातंत्रपूर्व काळापासून १९६४ पर्यंत जवळ जवळ २० वर्षे बार्शीत वास्तव्यास असलेले काशिनाथ मांडे यांचे व्दितीय सुपुत्र सुभाषचंद्र मांडे यांचे कर्करोगाने लातूर येथे निधन दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षै होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन‌ मुले , सुना, एक मुलगी , जावई व‌ नातवंडे असा परिवार आहे
सुभाषचंद्र मांडे हे बार्शीतील नावाजलेली शिक्षणसंस्था नवमहाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे संस्थापक थोर शिक्षणतज्ज्ञ भगवान बुचडे सर यांचे जावई होते.
असे मांडे घराण्याचे बार्शी शहराशी जुने नाते आहे.
सुभाषचंद्र मांडे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल मध्ये झाले . तर विज्ञान शाखेतील पदवीपर्य़ंतचे महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी काॅलेजमध्ये झाले.
कोल्हापूर विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी ही त्यांनी प्राप्त केली. लातूर शासकीय अध्यापक महाविद्यालयातून त्यांनी बी. एड. ,व एम एड. चे प्रशिक्षण ही प्राप्त केले‌
वडिलांच्या मृत्यूनंतर सुभाषचंद्र मांडे आई व भावंडांसमवेत आपल्या मूळ लातूर गावी स्थायिक झाले . तेथे प्रसिद्ध व्यंकटेश विद्यालय तसेच देशिकेन्द्र विद्यालय येथे शिक्षक म्हणून पाच वर्षे नोकरी ही केली.
नंतर नोकरीचा राजीनामा देवून स्वतंत्र क्लासेस सुरू केले.
मांडेज् क्लासेस म्हणजे
लातूरमधील दहावी विज्ञानाचे व अकरावी बारावी रसायनशास्त्राचे क्लास घेणारे पहिले क्लासेस होय.त्या काळात मांडेज क्लासेसचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःची स्वतंत्र प्रयोगशाळा व नियमित प्रयोग घेणारे लातूरमधील पहिले आणि एकमेव क्लासेस . ३५ वर्षे दहावी विज्ञान , अकरावी बारावी रसायनशास्त्र चे क्लास घेणारे एकमेव क्लासेस. माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणणारे क्लासेस म्हणून मांडेज् क्लासेसचा नावलौकिक होता. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राज्यात सर्वप्रथम क्रमांकाने प्राविण्य मिळवणारा लातूरमधील पहिला क्लास म्हणजे मांडेज्‌ क्लासेस.मांडेज् क्लासेसचे अनेक विद्यार्थी लातूर , पुणे , मुंबई, महाराष्ट्रात तसेच भारतात आणि परदेशात डॉक्टर , इंजिनिअर , प्राध्यापक म्हणून सध्या आपली सेवा देत आहेत. सुमारे दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सुभाषचंद्र मांडे सर यांनी घडवले .

लातूरचे सध्याचे प्रसिध्द  क्लासेसचे  संचालक मोटेगावकरसर , स्वामीसर , दिलीप बिराजदारसर हे सर्व मांडे सरांचेच विद्यार्थी.   

अनेक गरीब , गरजू विद्यार्थ्यांना मांडे सरांनी मोफत शिकवले
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव‌ लक्षात घेता श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या संचालकपदी त्यांची निवड करण्यात आली होती.

संचालक पदाची गेल्या आठ वर्षांपासून जबाबदारी सांभाळताना संस्थेच्या  देशिकेन्द्र  विद्यालय, , शंभुलिंग विद्यालय , निलकंठेश्वर विद्यालय  व विज्ञान कॉलेज ,  श्री महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविद्यालय  येथील   शिक्षक , प्राध्यापकांना  विज्ञान कसे   शिकवावे , प्रयोग कसे घ्यावेत याबद्दल तसेच  शालेय गुणवत्ता वाढीसाठी वेळोवेळी  मार्गदर्शन केले.   

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून‌ विद्यार्थी व नातलग मोठ्या संख्येने एकत्र जमले. या. ५ वाजता रेणापूर रोडवरील त्यांच्या शेतात पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्स्फूर्तपणे श्रध्दांजली वाहणा-यांची संख्या इतकी होती की अंत्ययात्रा शेतात पोहोचवल्या पासून अंत्यविधी उरकून सर्वजण माघारी फिरेपर्यंत एक तासापेक्षा जास्त काळ शोकसभा सुरु राहिली. अत्यंत मितभाषी, संयमी, सहनशील , मनमिळावू , प्रेमळ , दानशूर अशा व्यक्तिमत्वास अखेरचा निरोप देताना श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे यांच्यासहित अनेकांना आपल्या भावना न आवरता आल्यामुळे हुंदके व अश्रूंच्या रुपाने त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी खास दूतामार्फत मांडे यांच्या निवासस्थानी पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की सुभाषचंद्र मांडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दु:ख झाले . मांडे कुटुंबियांच्या दुखा:तर मी व‌ माझे कुटूंब सहभागी आहे. मांडे सरांच्या आत्म्यास शांती व‌ मांडे कुटूंबियास या दुखा:तून सावरण्याची शक्ति मिळो हीच ईश्वरापाशी प्रार्थना.

Leave a Reply