June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर शेंद्री फाट्यावर भीषण अपघातात एक ठार

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी-कुर्डवाडी रस्त्यावर शेंद्री फाट्यावर आयशर व टिपरच्या झालेल्या भीषण अपघातात आयशर चिलकाचा ठार तर एक गंभीर जखमी झाला.प्रजापती बालगीर रा.शिवनिलक ता.औसा जि.लातुर असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे..

बार्शी कुर्डवाडी रोडवर सुमारे १२ वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात आयशर चालक जागेवर ठार झालेला असून, दुसरा टिप्पर चालक गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे समोरासमोर

धडक होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .त्यामुळे बार्शी कुर्डवाडी रोड वर होणारी वाहतूक देखील ठप्प झाली होती. घटनास्थळी स्थानिकांन नागरिकांनी धाव घेतली. बार्शी येथील तालुका पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply