March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत सुट्टे पैसे घेण्याचा बहाना करत चकवा देऊन भर दिवसा एकाची फसवणुक

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सुट्टे पैसे घेण्याचा बहाना करत चकवा देऊन भर दिवसा एकाची फसवणुक केल्याचा प्रकार बार्शी शहरातील कुर्डुवाडी रस्त्यावरील एका रूग्नालयाजवळ घडला.

#पांडूरंग महादेव करणावळ वय- 49  रा. कासारवाडी ता. बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ते सकाळी बार्शी शहरात गेले होते. बाजार आटपून ते गावाकडे जाण्याकरीता बाळेश्वर नाका बार्शी येथे वाहनाची वाट पाहत थांबलेले होते
गावातील माझ्या ओळखीचा अर्जून धवडे हा आजारी असल्याने बार्शी येथे खाजगी
दवाखान्यात उपचार घेत असल्याचे त्यांना माहीत होते. परंतु तो नेमके कोणत्या दवाखान्यात उपचार घेत होता
याबाबत  माहीत नव्हते. त्याच्याबाबत विचारपूस करीत कुर्डूवाडी रोड, बार्शी येथे डॉ.
पोकळे यांचे दवाखान्याजवळ दुपारी 01/00 वा. चे सुमारास आले. ते दवाखान्यात जाण्यापूर्वीच तेथे थांबलेला
एक इसम त्यांच्या जवळ गडबडीत येवुन म्हणाला की, माझे नातेवाईक दवाखान्यात अॅडमीट आहेत.
माझ्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असुन, सुट्टे नाहीत, महत्वाची औषधे घ्यावयाची आहेत तुम्ही सुट्टे देता
का ? असे म्हणुन  त्याचे जवळील दोन हजार रुपयांच्या दोन नोटा दाखविल्या त्यामुळे फिर्यादीने त्याचेवर विश्वास
ठेवुन  500 रु. दराच्या नोटा काढल्या व त्यास एकुण 4 हजार रुपये दिले. परंतु त्याने  दोन
हजार रुपयांच्या नोटा दिल्याच नाहीत. तो माझ्याकडुन पैसे घेवुन गडबड करुन मेडीकल दुकानाच्या दिशेने
निघुन गेला. फिर्यादी त्याच्या पाठोपाठ गेले परंतु तो पुढे कोठे निघुन गेला हे दिसलेच नाही. तो आसपासच
कोठेतरी असेल तो परत येईल म्हणुन त्यांनी थोडा वेळ वाट पाहीली परंतु तो परत आलाच नाही.
त्यामुळे फसवणुक झाल्याची खात्री झाली. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply