बार्शीत संविधान दिनानिमित्त “एल्गार जनरल कामगार संगठनेच्या” वतीने महिलांना साडी वाटप

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
संविधान दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील एल्गार जनरल कामगार संघटनाच्या वतीने समाजातील उपेक्षित व वंचित घटकामधील महिलांना साडी वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
साड्या वाटप कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कांबळे, महिला संघटनेच्या अध्यक्ष संगीता पवार, प्रकल्प व्यवस्थापक निलेश मुद्दे, शहर अध्यक्ष अजय कसबे,संंपादक संदीप मठपती उपस्थित होते.
यासाठी एल्गार जनरल कामगार संघटनेचे, पदाधिकारी दादा फुले, राजू बनसोडे, अक्षय आनाळकर, उस्मान भाई फकीर, खजिनदार महादेव नामदास, युवराज वाघमारे, गणेश पवार, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मुद्दे यांनी तर अनिकेत चिकने यांनी आभार मानले.