October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत संत रोहिदास महाराज यांची जयंती सहजीवन संस्थेच्या कार्यालयात साजरी

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
येथील सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी दीनानाथ काटकर, बालाजी डोईफोडे, अंकुश कंगले, ॲड. सुहास कांबळे, रामभाऊ कबाडे, सोमनाथ कांबळे, योगेश मस्तूद, गणेश कबाडे, रोहिदास व्हनकळस, बापूसाहेब जाधव, किशोर कांबळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

संत रोहिदास महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात केले ते आजही अविरत सुरू आहे. आपण सर्वांनी त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत आपल्या संपूर्ण समाजापर्यंत ते पोहोचविले पाहिजेत असे मनोगत व्यक्त करताना दीनानाथ काटकर यांनी सांगितले, तसेच संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे, चंद्रकांत राऊत यांनी जयंती निमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सचिव ॲड. सुहास कांबळे यांनी मानले.

Leave a Reply